मराठीचे वर्चस्व दिवसेंदिवस इंटरनेटवर वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी जीथे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मराठी वेबसाइट होत्या तिथे आता मराठी वेबसाइट शेकडो निर्माण झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षामध्ये मराठी वेबसाइटचा वेग झपाट्याने वाढलेला दिसतो. मराठी माणसाप्रमाणे मराठीभाषादेखिल आपली प्रगती करीत आहे, हे यावरुन दिसून येते.

इंटरनेटवर आपले ई-मेल चेक करणे आणि एखाद दुसरी वेबसाइट पाहण्याव्यतिरीक्त इंटरनेटवर जास्त संशोधन करतान फारसे कुणी आढळत नाही. याचे कारण बहूदा मुळात इंटरनेचेच ज्ञान कमी असू शकते.

कुठलीही गोष्ट लवकरात लवकर शिकण्याचे मुख्य साधन म्हणजे कुणीतरी शिकविणारा पाहीजे. जर कुणीतरी शिकविणारा असेल तर लगेच कळते, तर मग जगभरातील सर्वत्र पोहोचलेल्या मराठी माणसाला चांगल्याप्रकारे इंटरनेट शिकविण्याचे इंटरनेट हे एकमेव चांगले माध्यम आहे. हाच विचार करुन इंटरनेटचा वापर मराठी माणसाला अधिक चांगल्याप्रकारे करता यावा या उद्देशाने नेटशिका.कॉम या वेबसाइट बनविण्याचा मनात विचार आला.

नेटशिका.कॉम वरील माहिती इंटरनेटवर काम करणार्‍या मराठी माणसाठी फार उपयोगाची असल्याने आपण ती कोणत्याही परवानगीशिवाय कुठेही वापरु शकता. त्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही परंतू नेटशिका.कॉम वरील माहिती जेथे वापरली जाईल तेथे 'नेटशिका.कॉम' या संकेतस्थळाचे नाव लिहिणे तितकेच आवश्यक आहे.

भरपूर मेहनत घेऊन जमविलेल्या या माहितीला जर आपण सहज कुठेही वापरत असाल तर तेथे या संकेतस्थळाचे नाव द्यावे हे आपले कर्तव्य आहे.

  मागे जाण्यासाठी इथे क्लिक करा.
नेटशिका.कॉमचे हक्क राखिव नाहित आपण यातील माहिती कुठेही वापरु शकता. - सचिन पिळणकर - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.